बिलोली तालुक्यातील कौठा येथे घरफोडी ; अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
             येथील पोलीस स्टेशन अंतर्गत असल्येल्या मौजे कौठा येथे दिनांक 26 रोजी सकाळी 9:30 च्या दरम्यान फिर्यादीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दोन लाख तीन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे… 
             कुंडलवाडी शहरापासून 8 किमी अंतरावर असलेल्या मौजे कौठा येथे दिनांक 26 रोजी सकाळी 9:30 च्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी शेख सलीम आयातसाब यांच्या घरातील माणसे बाहेरगावी गेल्याचे पाहून घरातील 1,26000 नगदी रुपये,77600 रुपयांचे सोने चांदीचे मुद्देमाल असे एकूण दोन लाख तीन हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर फिर्यादी शेख सलीम आयातसाब वय वर्ष 55 वर्ष,व्यवसाय शेती, राहणार कौठा यांनी तात्काळ पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे कळविल्यानंतर दिनांक 27 रोजी दुपारी 12 वाजता कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक व घटनास्थळाची अंगुळी मुद्रा घेऊन पंचनामा केला आहे.वरील फिर्यादीच्या फिर्यादी वरून दिनांक 28 रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुरन 45/ कलम 454,457,380, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे हे करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या