हेमाडपंथी महादेव मंदिरात गुप्तधनाच्या लालसेपोटी अज्ञात व्यक्तीकडून मंदिराचे उत्खनन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील फ्लेमिंगो औषधे कंपनीच्या शेजारी असलेल्या कमठेवाड यांच्या शेतातील फुल मळ्याच्या महादेव समजले जाणारे हेमाडपंथी महादेव मंदिरात अज्ञातांनी महादेवाची पिंड बाजूला सरकवून उत्खनन केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून सदरची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे घटनास्थळी पोहचले. श्वान पथकासह फिंगर प्रिंट तज्ञांची टिम हजर झाली आहे. सदरचे उत्खनन हे धनाच्या लालसेने करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीत फ्लेमिंगो औषधी कंपनीच्या शेजारी असलेल्या कमठेवाड यांच्या शेतातील फुल मळ्याच्या महादेव समजले जाणारे ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. यापुर्वी मंदिराच्या आजुबाजूला अनेकवेळा उत्खनन झाले असून. याबाबत तेथील नागरिक आजही सांगत आहेत. जे आजुबाजूला उत्खनन झाले ते केवळ गुप्तधन काढण्यासाठीच करण्यात आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मंदिराच्या बाहेर आजपर्यंत उत्खनन झाले असल्याने त्या भागातील नागरिकांनी याबाबत गांभीर्याने घेतले नव्हते. पण आज सकाळी थेट मंदिराच्या गाभाऱ्यातच महादेवाची पिंड बाजूला करुन उत्खनन केल्याचे दिसून आले. त्यामुळे खळबळ तर उडालीच पण महादेवाची पिंड अस्तव्यस्त करत उत्खनन केले असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सदरील घटनेची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी व बिट जमादार कुमरे हे घटनास्थळी पोहचले असून श्वान पथक फिंगर प्रिंट तज्ञांची टिम हजर झाली आहे.
पण श्वान पथकाला कुठलाही मार्ग सापडला नाही त्यामुळे ज्या कोणी उत्खनन केले आहे ? ते वाहनातून आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक वास्तू असल्याने काहीतरी सापडेल याच उद्देशाने थेट मंदिराच्या गाभाऱ्यात उत्खनन करण्यात आले परंतु कुणीतरी आले असावे किंवा येत असल्याने उत्खनन करणाऱ्यांनी कुदळ फावडे व पाण्याचा कँन जाग्यावरच सोडून पळ काढला आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
————————————————————
सध्या गावोगावी चोरटे येत असल्याच्या अफवेने नागरिकांची झोप उडालेली असतांनाच अज्ञातांनी नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या मंदिरालाच लक्ष करुन ऐतिहासिक मंदिरात महादेवाची पिंड बाजूला फेकून पिंडीच्या खालीच उत्खनन केले आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून जनता तर सोडाच आता मंदिरेही सुरक्षित राहिले नसल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या