कुंडलवाडीत सावकाराच्या घरी चोरी; मुलाच्या लग्नासाठी बाहेर गावी असताना चोरट्यांनी मारला घरावर डल्ला !

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
येथील मुख्य बाजार पेठेत असलेल्या गंगाधर उपलंचवार यांच्या घरी मुलाचे लग्न असल्याने सर्व कुटुबिय लग्ना निमित्य बाहेर गावी असल्याच पाहुन चोरत्यानी ४ लाख ३६ हजार रुपयाचे सोन्याच्या दागींने सह नगदी ८० हजार रुपये असे एकूण ५ लाख १६ हजार रुपये चोरी झाल्याची घटना ३ डिसेंबरच्या दुपारी ४.३० वा ते ४ डिसेंबर सकाळी ९.३० च्या दरम्यान घडल्याचे फिर्यादी विजय गंगाधर उपलंचवार यांनी दिल्यावरून कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडलवाडीच्या मुख्य बाजारपेठ गंगाधर उपलंचवार यांचे घर असून त्यांच्या मुलाच लग्न ४ डिसेंबर रोजी धर्माबाद येथे असल्याकारणाने सर्व कुटुंबीय 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान धर्माबादकडे लग्न निमित्त रवाना झाले,घरी कोणीच नसल्याने पाहून चोरट्यांनी घर फोडले त्यात एकूण १०९ ग्राम सोन्याचे दागिने व नगदी ८० हजार रुपये या असे एकूण ५ लाख १६ रुपये चोरून नेल्याचे घटना घडली,सदरील घटना कळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला तर नांदेड हुन चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथक सह फॉरेनसिक टीमच्या माध्यमातून बोटांची ठसे घेण्यात आले. त्यानंतर घटना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड़ यांनीही भेट दिली तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी हे करत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या