नायगाव साई स्मरण किराणा दुकानची अज्ञात चोरट्याकडून धाडसी चोरी !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील नांदेड हैदराबाद महामार्गावर असलेल्या नायगाव शहरातील हेडगेवार चौकापासून शंभर फुट अंतरावर असलेल्या मुख्य मार्केट मधील साई स्मरण किराणा दुकानाची चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून धाडसी चोरी केली. तर अज्ञात चोरट्यांकडून श्रीनिवासा किराणा दुकानचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न फसला.
नायगाव येथील मुख्य बाजारपेठेत असलेले साई स्मरण किराणा दुकान सकाळी आठ वाजता रोजच्या प्रमाणे सोमवार यांचे मेहुणे गणेश कोडगिरे यांनी उघडले असता अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे समजले. त्यांनी दुकानाचे मालक प्रवीण सोमवार यांना फोनवरून चोरीची माहिती सांगितली.
प्रवीण सोमवार यांनी दुकानाचे पाहणी केली आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला मोबाईल द्वारे संपर्क साधून चोरीची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जमादार साई सांगवे यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली.

त्यावेळी अज्ञात चोरट्याने दुकानावरील पाठीमागच्या मजल्यावरून दुकानात प्रवेश करून दुकाना मधील सुरज जर्दा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्ल्याक बॉक्सेस असे एकूण २ लाख ७० हजार रुपयाचा माल घेऊन फरार झाल्याची घटना दिनांक ५ ऑगस्ट व ६ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
चोरी करून दुकानातील सी.सी.टी.व्ही, डी व्हीं आर चोरटे सोबत घेऊन गेल्याची माहिती साई स्मरण किराणा दुकान मालक प्रवीण सोमवार यांनी दिली. 

  प्रविण सोमवार यांनी नायगाव पोलीस स्टेशनला जाऊन चोरीची फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. यापूर्वी सुद्धा साई स्मरण किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने समोरचे शटर वाकवून चोरी केली असल्याची घटना घडली होती. अधिक तपास नायगाव पोलीस करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या