दुर्गा देवीचे चांदीचे मुकुट चोरीला एका आरोपीस अटक !

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
शहरातील नरागल्ली दुर्गा मंडळाच्या दुर्गा देवीचे 25 तोळ्यांचे चांदीचे मुकूट दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी चोरीला गेले होते. त्या अनुषंगाने फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 11 रोजी कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे गु र नं 106/22 क 379 भा दं वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात नरागल्ली दुर्गा मंडळ यांनी बसविलेल्या देवी वरील 12,500 रुपय किंमतीचे 25 तोळे वजनाचे चांदीचे मुकुट चोरीला गेलेले होते. सदर गुन्ह्याच्या तपासाअंती आरोपी लक्ष्मण नरसिमलू मुक्केरवार वय 50 वर्ष राहणार कुंडलवाडी यास अटक करुन त्याच्या ताब्यातील 25 तोळे चांदीचा मुकुट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी हे करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या