मुसळधार पावसामुळे कुंडलवाडीचं जनजीवन विस्कळीत शहरालगत असलेला थेर तलाव ओवरफ्लो !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

येथील शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, शहरालगत असलेल्या नांदेड वेस येथील थेर तलाव ओवरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच शहरातील डॉ.आंबेडकर नगर,साठे नगर मधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तुचे नुकसान झाले आहे, तर शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे.असे असले तरी शहरापासून जवळच असलेल्या हरनाळी,नागणी,कोटग्याळ,माचनूर या गावच्या ओढ्याला पुर आल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे.
तर शहर व परिसरातील ओढ्याना,नाल्यांना पुर आल्यामुळे हाताशी आलेले हजारो हेक्टर मूग,उडीद,सोयाबीन,कापूस ही पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शहर व परिसरातील सर्व पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराज्या करीत आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या