शिक्षणा शिवाय माणवाची प्रगती नाही – समतादुत दिलीप सोंडारे !

[ नायगांव ता.प्र. – गजानन चौधरी ]
आजच्या विज्ञाणाच्या युगात शिक्षणा शिवाय माणवाची प्रगती होणार नाही म्हणुन सर्वांनी शाळेला पवित्र मंदिर समजुन दररोज शाळेत यावे असे आवाहन नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी केले.
दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन डॉ.राधाकृष्न सर्वपल्ली यांच्या जयंतीचे औचीत्य साधुन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणेचे नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी सनराईज ईंगलीश मेडीयम स्कुल नरसी येथे शिक्षक दिन कार्यक्रम आयोजीत केला होता.
अध्यशस्थानी मुख्याद्यापक बालाजी वाघमारे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन समतादुत दिलीप सोंडारे होते. यावेळी बार्टिच्या विवीध योजनांची माहिती समतादुत यांनी दिली.
यावेळी सौ.बच्येवार, सौ.जाधव, सौ.परगेवार, सौ.रेश्मा, कु.हजुबि, स.शि.ईसाफोदीन, लिपिक कांबळे, वाचमन जिलानी, सेविका डोंगरे सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर प्रबोधन कार्यक्रम बार्टिचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभीये, जिल्हा प्रकल्प अधिकरी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या