पिंपळगाव येथे तिसरे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी पासून जवळच अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाले. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव येथील सरपंच सौ.ध्रुपताबाई रमेश गायकवाड या उपस्थित होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच माधव राठोड,शालेय शिक्षण समितीचे सदस्य सौ.चंद्रकला वाघमारे,केरबा गायकवाड, नागनाथ सह आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम सावित्रीबाई ज्योती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पहार देऊन स्वागत तथा सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सौ.भैरवाड यांनी आधार मॅच, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती याबाबत आढावा घेऊन विद्यार्थी आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या. तर केंद्रप्रमुख नारायण वाघमारे यांनी अध्ययन निश्चिती स्तरबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेचे सुलभक सौ. शिवकन्या पटवे व सौ.कल्पना सुरकुटलावार यांनी निपुण भारत याविषयी सविस्तर माहिती दिल्या. याप्रसंगी या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेमध्ये संत व महात्मा यांचे वेशभूषा करून त्यांचा परिचय करून देऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .सदरील शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बंडे मॅडम,आंबटवार सर, पवन गट्टूवार, सौ.भाग्यश्री गोसके, सौ.रेणुका मडपलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिक्षण परिषदेची सांगता स्वरूची भोजनाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंबटवाड सर तर सुत्रसंचालन व आभार शाळेतील सहशिक्षिका सौ.भाग्यश्री गोस्के ( बाभळीकर) यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या