बसवराज यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टिप्पर व चालकास अटक

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
अखेर लोहा – कंधार रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या बसवराज सोनवळे यांना धडक मारुन‌ व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार हायवा टिपर चालकांच्या मुसक्या लोहा पोलीसांनी टिपर सहित आवळल्या ; पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी उत्कृष्ट तपासाची चक्रे फिरवून आरोपीस केले गजाआड.
लोहा -कंधार रोडवर मॉर्निंग वॉक गेलेल्या बसवराज सोनवळे या युवकाला भरधाव वेगात निष्काळजीपणाने हायवा टिपर चालकांने टिप्पर चालवून जोरदार धडक मारून गंभीर जखमी करून फरार झालेल्या बसवराज सोनवळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या टिप्पर चालकास लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी तपासाची चक्रे फिरवून मुखेड येथून अटक केली आहे.
लोहा पं. स. अंतर्गत जि.प. शिक्षक असलेले शिवराज सोनवळे यांचे चिरंजीव बसवराज सोनवळे हे दि. ३० एप्रिल रोजी सकाळी लोहा -कंधार रोडवर मॉर्निंग वॉकला गेले अवैध वाळू ची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर चालकांने त्यास भरधाव वेगात निष्काळजीपणाने गाडी चालवून जोरदार धडक मारून गंभीर जखमी केले होते तेव्हा बसवराज सोनवळे यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दि. ४ हे रोजी मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी लोहा तहसील कार्यालयात बसवराज सोनवळे यांचे प्रेत आणून त्या हायवा टिप्पर चालकास तात्काळ अटक करावी म्हणून लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांच्या कार्यालयात ठांड मांडून लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांना धारेवर धरले होते. त्या हायवा टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी जोर लावून धरली होती. तेव्हा तहसीलदारांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत हालवून अंत्यविधीसाठी नेले.
तसेच सदरील प्रकरणात लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी तपासाचे चक्र फिरवली. तसेच याबाबत मयत युवक बसवराज सोनवळे यांचे आजोबा दिंगाबर रामचंद्र सोनवळे यांनी लोहा पोलीसांत फिर्याद दिली असता आरोपी टिपर क्रमांक एम एच ४८ एजी ८४२७ चा चालक संतोष शंकरराव गव्हाणे वय २३ वर्ष रा. मुखेड ता. मुखेड यांच्या विरोधात लोहा पोलीसात गुरन १००/२०२२ कलम ३०४ (अ)२७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करून टिपर सहित अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी पिएसआय सोनकांबळे यांनी दिली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या