10 वी 2021 माध्यमिक शालांत परीक्षेत म्हसळा तालुक्यात मुलींचे यश !

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)
2021 च्या 10 वी च्या मुलींनी तालुक्यात बाजी मारली आहे. कु.दीक्षा नितीन बोरकर न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा हिने 95.40%-इतके गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांकाने यशप्राप्त केले.
संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रभाकर मोरे, स्कुल कमेटीचे चेअरमन समीर बनकर शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कुल खरसई चा विद्यार्थी कु. जिग्नेश महादेव शीतकर याने 92.60% गुण घेऊन तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री गणी मुलानी, शिक्षक, कर्मचारी ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण चे हार्दीक अभिनंदन करण्यात आले. जिजामाता मराठी माध्यमिक शाळा वरवठणे आगरवाडा शाळेची कु. टीना महादेव गाणेकर हिने 92.40 % गुण घेऊन तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. कु मानसी रमेश पदरत हिने 90% गुण मिळविले.

शाळेचे अध्यक्ष मा.महादेव पाटील साहेब, मुख्याद्यापक श्री संदीप सुतार, शिक्षक, कर्मचारी यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंद केले. को. ए. सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसूरी शाळेचे विद्यार्थिनी कु.प्राजक्ता दिपक पाटील 92%, कु.निवळकर शणेश्वरी अनिल 87%, प्रभाकर पाटील माध्यमिक शाळा पाष्टी कु कांबळे निधी संदीप 86%. असे गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या