मिलिंद विद्यालयात एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार !

  • 8 वर्षात 57 शिष्यवृतीधारक बनविणारी बिलोली तालुक्यातील पहिली शाळा
  • — येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयातील 16 विद्यार्थी एन .एम. एम. एस.( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती )परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने आज शाळेच्या वतीने आजादी का सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.
  • .या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एम. एस .खंदारे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. पांचाळ हे उपस्थित होते.
  • याबाबत सविस्तर माहिती अशी की, जून 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) शिष्यवृत्ती परीक्षेत येथील मिलिंद विद्यालयाचे विद्यार्थी यावर्षी देखील सदर परीक्षेत बाजी मारून 16 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत.
  • याकरिता आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले. मागील आठ वर्षापासून या विद्यालयात दरवर्षी एन .एम. एम. एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना बसवले जाते .गेल्या आठ वर्षात या शाळेने 57 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बनवले .या प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील चार वर्षासाठी म्हणजेच इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 48 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते. मागील आठ वर्षाचे यश पाहता 57 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून मिलिंद विद्यालय बिलोली तालुक्यात प्रथम क्रमांकावर आघाडीत आहे. याप्रसंगी आज या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर यांनी संदेश पाठवून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
  • तसेच या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले मार्गदर्शक शिक्षक बालाजी गंगोणे यांचाही शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक या शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक अमरदीप दगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळेतील सहशिक्षक एस.डी. चंदनकर यांनी मानले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या