तोरणा ग्रामपंचायत सरपंचपदी मारोती वाघमारे यांची निवड !

( विशेष प्रतिनिधी- चंद्रभीम हौजेकर )

बिलोली तालुक्यातील तोरणा ग्रामपंचायतीची सरपंच उपसरपंच पदाची गणपुर्ती अभावी निरंक ठेवण्यात आली असलेली निवड १४ फेब्रुवारी रोजी पार पडली.

सरपंचपदी मारोती चांदू वाघमारे तर उपसरपंच पदी आनंद नरवाडे यांना विराजमान होण्याचे अधिकार निवडणुक निर्वाचन अधिकार मा.यमलवाड,गिरी मॅडम ग्रामसेवक, बालाजी पा.नरवाडे, यांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आले.

सदरिल, सरपंच -उपसरपंच पदाच्या निवडीत पोलीस पाटील देवराव पा.नरवाडे, ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते. तर यावेळी गुलाब महाजन पा.नरवाडे- तालुका भाजप चिटणीस, मा.विजय लक्ष्मणराव (गुरुजी) नरवाडे, लक्ष्मण गायकवाड -सामाजिक कार्यकर्ते, गुलाब जक्कोजी पाटील, प्रकाश दिगंबर पाटील, प्रल्हाद पाटील, लक्ष्मण पाटील, मारोती पाटील, रंगोजी पाटील,माधवराव पाटील नरवाडे, माधवराव, नागोराव, आत्माराम, मारोती गायकवाड, तुकाराम हैबते, संजय, गौतम जोंधळे,शेषेराव सोनकांबळे, मालोजी, माधवराव, रेशमाजी, रावसाहेब, संभाजी, धोंडीबा, सुनील वाघमारे, युवा कार्यकर्ते हानमंत गायकवाड, दिलीप, दत्ताहरी, शिवाजी,भीम, राजू, शुद्धोधन, दिगांबर, शिध्दार्थ वाघमारे, राजू वाघमारे
यांच्यासह आदी जनांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या