विजय पटणे मेमोरियल स्कूलची शैक्षणिक सहल माहूरगडावर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या विजय पटणे मेमोरियल स्कूलची एक दिवशीय शैक्षणिक सहल दिनांक 5 रोजी केदारगुटा, माहूर येथील रेणुका माता, अनुसया माता, दत्त मंदिर, उनकेश्वर, सशस्त्रकुंड धबधबा, आदी ठिकाणी काढण्यात आली. या सहलीत इयत्ता पाचवी ते दहावीच्या 130 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

सदरील सहलीत विद्यार्थ्यांना उनकेश्वर येथील गरम पाण्याविषयी वैज्ञानिक माहिती सहशिक्षिका प्रियंका सोनकांबळे, सुवर्णा पांचाळ, यांनी दिली तर सहस्त्रकुंड धबधबा येथे भौगोलिक माहिती सहशिक्षक विनायक इंगळे, अमरनाथ कांबळे,राम बादेवाड, गंगाधर दगडे, यांनी दिली आहे.तर सहलीची सांगता रात्री उशिरा बिलोली येथे करण्यात आली आहे.
यावेळी सहल प्रमुख म्हणून मुख्याध्यापिका जयमाला पटने, प्रभुनाथ गंगुलवार, विनायक इंगळे,आदींनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य अमरनाथ कांबळे, संध्या पाटील, गंगाधर दगडे, प्रल्हाद हातोडे, राम बादेवाड, सुवर्णा पांचाळ,प्रियंका सोनकांबळे, बालाजी पोरडवार, किरण उपलवार, प्रियंका येमेकर, प्रणिता कनशट्टे,सुरेश मुंडकर, मारोती गोलोर आदिनी केली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या