व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने २५ शेतकरी प्रशिक्षणासाठी व्हीएसआय पुण्याला रवाना !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगाव मतदार संघातील उमरी, धर्माबाद, नायगाव व त्यासोबत भोकर,बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, आपल्या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या हेतूने व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असतात त्यासाठी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज २५ तरुण शेतकरी प्रशिक्षणार्थी व्हीएसआय पुण्याला रवाना झाले आहेत.
शेती करतांना शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीचा त्याग करून आधुनिक ऊस शेतीची कास धरावी व उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील व्हावे यासाठी शेतकऱ्यांना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे होत असलेल्या ४ दिवसीय ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणास वर्षातून २ वेळा वेगवेगळ्या तरुण शेतकऱ्यांना पाठवण्याचे
नियोजन २ वर्षापासून चालू आहे. त्या अनुषंगाने १८/१२/२०२३ रोजी एकूण २५ तरुण शेतकरी प्रशिक्षणार्थी यांना आधुनिक ऊस उत्पादन घेण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.२ वर्षांपासून प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यास याचा फायदा होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमुलाग्र बदल केल्याचे दिसून येत आहे. केवळ ऊस शेतीच नाही तर त्या सोबत शेती पूरक जोड व्यवसाय करण्यासाठीच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन व्हीपीके उद्योग समूहाच्या माध्यमातून करण्यात येते.
साईकृपा दूध डेअरी सिंधीच्या माध्यमातून गावोगावी दूध संकलन केंद्र स्थापन करून शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी गावातच सोय उपलब्ध करून दिली आहे व डेअरीच्या माध्यमातून दर दहा दिवसाला दुधाचा ताजा पैसा शेतकऱ्याच्या खिश्यात घालण्याचे काम या समूहाने केले आहे.
जनावरांचे संगोपन करून दुधाच्या माध्यमातून ताजा पैसा शेतकऱ्यांना तर मिळतोच परंतु जनावरांचे मल-मूत्र हे शेत जमिनीचे शेंद्रियकर्ब वाढविण्यासाठी वाढा अत्यंत फायदेशीर असल्यामुळे त्या शेणखताचा वापर शेतीत करून जमीन सुपीक व कसदार बनवण्याचे कार्य शेतकऱ्याकडून होत आहे. मतदार संघात उद्योग समूहातील ३ ऊस कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना ऊसाचा शाश्वत पैसा तर मिळतोच आहे. परंतु त्यासोबत जवळपास चार हजार पाचशे बेरोजगारांना रोजगार निर्मिती या माध्यमातून उद्योग समूहाने केली आहे.
फक्त शेतीच नाही तर विविध व्यवसाय व छोटे उद्योग उभारू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना शेतीशी निगडित वेगवेगळे व्यवसाय करतील करता येतील कारण तरुण शेतकरीच हा देश घडवण्याचं काम करत आहेत व्हीपीके पतसंस्थेच्या माध्यमातून अल्पावधीत कर्ज पुरवठा केला गेला. पतसंस्थेच्या जिल्ह्यातील २० शाखांच्या माध्यमातून अर्थपूर्ण मदत केली जाते. आपल्या मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ढोलउमरी, उमरी व वाघलवाडा कारखाना येथे शैक्षणिक संस्थांची उभारणी करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्योग समूहा मार्फत केवळ नफा न पाहता आपण समाजाचे काही देणे लागतो या समर्पक भावनेने काम केले जाते.
तसेच सामूहिक विवाह सोहळा, आरोग्य शिबिरे, आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत, वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे व या सारखे अनेक सामाजिक उपक्रम उद्योग समूहाच्या वतीने मतदार संघात राबवले जातात. नायगाव मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार व सर्व सामान्य जनतेचा विकास करण्यासाठी मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी उद्योग समूहाची रचना करून सर्वसामान्य शेतकरी व बेरोजगार तरुण यांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ आता दिसत आहे. मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या उद्योग समूहातील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन सकारात्मक दृष्ट्या विचार करून सर्व जनतेने विकासाची कास धरून आपली प्रगती साधावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.सर्व प्रशिक्षणार्थीचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या