परसबाग निर्मिति कार्यक्रमाचे प्रशिक्षण !

[ रायगड प्रतिनिधी – प्रा अंगद कांबळे ]
सहाय्यक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सपूर्ण महाराष्ट्रात अर्मेनिया फ्री इंडिया फोरमच्या माध्यमातून गावागावात आणि प्रत्येक शाळेत परसबाग निर्मिति कार्यक्रमाचे प्रशिक्षण सुरु होत आहे. याचा शुभारंभ महाड तालुक्यातून होत असले तरी म्हसळा तालुक्यातील मादांटने ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत आहे ज़ी अमेनिया फ्री व्हिलेज (क्षयमुक्त ग्रामपंचायत ) करणार आहे.

त्या बाबत प्राथमिक स्तरावरचा जनजागृती कार्यक्रम 25 नोहेंबर 2021 रोजी पाष्टि येथे पार पड़ला. 25 डिसेबंर 2021 रोजी परसबाग निर्मिति कार्यक्रम महिला बचतगट आणि शेतकरी यांच्या साठी आयोजित करण्यात आलेला आहे. रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होवू नये यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे व संतुलित आहारात पालेभाज्या, फळे याचा समावेश करणे आवश्यक आहे. रासायनिक खताची फवारणी मात्रा न वापरता घरच्या घरी परसबागेत सेंद्रिय खताचा वापर करुण पालेभाज्या तयार करणे हा प्रशिक्षणाचा भाग आहे.
हे प्रशिक्षण घेण्यासाठी सहाय्यक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने श्री अतेश गायकवाड़, श्री प्रमोद शिंदे, श्री कमलेश कोरपे यांचे सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून श्री बबन मनवे पशु व कृषी सभापती म्हसळा,  तहसीलदार श्री घारे साहेब तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री चंद्रकांत पवार, उपसरपंच शंकर साहेब ग्रामपंचायत सदस्य असणार आहेत तरी सर्व नागरिकांनी सहभाग नोदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या