अँड भोसले मॅङम यांनी पिंपळ वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासली !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगांव येथील दिवाणी न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना थंड सावली मिळावी या दूरदृष्टीने वृक्षप्रेमी तथा नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅडम यांनी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयांच्या परिसरात नागरिकांना २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ वृक्षाची लागवड करून सामाजिक बांधिलकी जपत त्या झाडाची मोठे होई पर्यंत देखभाल करणार असल्याचे सांगितले असून यामुळेच त्यांचे पक्षकारातून कौतुक केले जात आहे.
पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे.मात्र त्या सावलीचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं जाते पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. पिंपळाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हे असं झाड आहे जे दिवसातील २४ तास नागरीकांना ऑक्सिजन मिळवून देतं.
याच्या सावलीचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे प्रत्यकाने एका वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जपावे असे नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅडम यांनी सांगितले.
आपण जर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला लक्षात येईल की, मानवाचे आयुष्य पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे वृक्ष नसते तर आपले जीवन जितके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. मात्र भरपूर प्रमाणात वृक्षतोड तोड होत आहे.त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
सोबतच आपले ऋतुचक्रही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सरकारी वकील भोसले मॅङम यांनी पिंपळ वृक्ष लागवड केले आहे. यावेळी नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅङम ,एम.एस.नरवाडे , अँड.एस.जी.कोकणे, अँड.पि.एम.वाघमारे, अँड.मांजरमकर, शैलेश मगिरवार ,पोकॉ.रावसाहेब कदम ,पो.हे.कॉ.शिंदे ,पो.कॉ.वर्षाताई पो कॉ.निकम यांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या