अल ईम्रान प्रतिष्ठान च्या वतीने पर्यावरण दिन साजरा !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]

प्रदुषण नियंत्रणात ठेवणे व पर्यावरणाचा -हास थांबवून संवर्धन करणे हि काळाची गरज ओळखून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय अर्जापूर व हु.गोविंदराव पानसरे यांच्या समाधी परिसरात या ठिकाणी विविध प्रकारचे, जातीचे वृक्षलागवड करुन पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अर्जापूर ग्रामपंचायत चे सरपंच सिध्दार्थ नागोराव पतंगे यांच्या हस्ते जाबांचे झाड लावण्यात आले. सागवान, कारंज, आवळा यासह ईतर प्रकारचे झाडे लावण्यात आले.

यावेळी उपसरपंच शेख.पाशामियाँ जमालसाब, अल ईम्रान प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान, सामाजिक वनीकरण चे वनरक्षक सय्यद एफ.एच, वनरक्षक व्हि.एम.अंबुलगे यांच्यासह अमोल भास्कर, माधव सायन्ना नायलोड, चेतन पतंगे,अजय डांगे,विठ्ठल कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या