भास्कर कोकणे यांचा पुढाकार ; झाडे लावून संगोपन करणारे कोकणे दांपत्य

[ नायगाव बा. ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
लग्न वाढदिवस असो आपल्या कुटूंबातील अन्य सदस्यांचा वाढदिवस असो इतर अनाठायी खर्चाला बगल देत नरसीच्या कोकणे परीवारांनी गत तिन वर्षांपासून अभिनव उपक्रम हाती घेतला असून खंडोबा मंदिर परिसरात वक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करतात.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे.विशेष म्हणजे या उपक्रमावर लाखो रुपये खर्च करत आहे.पण प्रत्येक्षात याची किती योग्य पध्दतीने ग्रामीण भागात अंमलबजावणी होते हा संशोधनाचा विषय ठरला आहे.दरवषी वृक्षारोपण करण्यात येते पण खड्डा तोच अशीच काहीशी परिस्थिती आहे लावलेल्या झाडांची देखभाल होत नसल्याने झाडं पंधरा दिवस देखील राहत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
एकीकडे ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड वाढली आहे. मोठ मोठाले झाडे बिनधास्तपणे कत्तली करून महामार्गावर वाहतूक केली जात असतानाही याकडे संबंधित अधिकाऱ्यांनीही कमालीचे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
वृक्ष लागवड ही काळाची गरज म्हणून नरसीच्या भास्कर कोकणे या युवकांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि आपल्या बाळांचा व आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एक नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या तीन वर्षापासून कोकणे हे राबवित आहेत आपल्या लग्नाचा वाढदिवस असो की मुलांचा घरातील कोण्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस असो इतर अनाठायी खर्चाला फाटा देऊन फक्त वृक्षारोपण करत आहेत गेली तिन वर्षांत अनेक झाडे शेतात लावली आहेत नुसतं झाडं लावून थांबले नाहीत तर ति जगविण्यासाठी जबाबदारी स्वीकारली आहे.खंडोबा मंदिर परिसरात देखील आजपर्यंत लावलेली अनेक झाडे ताठ मानेने उभे आहेत.काल रेणुका भास्कर कोकणे यांच्या १४ व्या लग्नाचा वाढदिवस ही वृक्षारोपण करून साजरा केला खंडोबा मंदिर परिसरात बेलाचे, जांभळीचे इतर झाडे लावली आहेत गत वर्षी साईराज कोकणे, मुलगी किरण कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतात गेल्या वर्षी लिंबाचे , वडाचे, सप्तपर्णीचे झाडांची वृक्षारोपण केली आहे.आज पर्यंत जवळपास अनेक जातींची शंभर झाडे लावली व संगोपन करून जगविले आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण आम्ही वृक्षारोपण करून झाडे जगविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे इतर अनाठायी खर्च करून काय उपयोग होणार आहे आम्ही लावलेली प्रत्येक झाडं आज डोलाणे उभी आहेत ते पाहून आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया भास्कर कोकणे यांनी दिली.राजकारणाचा विषय सोडून समाजकारण करण्याचे जिद्द आहे.
काहीतरी सामाजिक उपक्रम राबविण्यात यावी यासाठी आपण दरवर्षी झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या