चळवळीतील एक आधारस्तंभ म्हणजे एन.डी. पाटील – प्रकाश आंबेडकर

मुंबई – आंदोलन कोणाचेही असो, कोणीही फोन केला की, तुम्ही आमचं नेतृत्व करा. त्यांनी पक्ष, संघटना बघितले नाही, फक्त विचार बघितला आणि त्यांच्या बरोबर चालत राहिले. त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं. असे फार कमी लोक असतात ज्यांची विचारसरणी, स्पष्टता ही आयुष्यभर कार्यकर्त्यांचा ठेवा म्हणून राहील.
अशा व्यक्तीला भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी अन आंबेडकर परिवाराच्यावतीने भावपूर्ण आदरांजली. अशी प्रतिकिया ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आज मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या बैठकीत प्रा. एन डी पाटील यांच्या अभिवादनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी उपस्थित राज्य कार्यकारिणी सदस्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या