माजी आमदार कै बळवंतराव पाटील चव्हाण यांचे बंधू कै. शंकरराव पाटील चव्हाण यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने शेतातील समाधी स्थळावर पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कै. शंकरराव अमृतराव पाटील चव्हाण हे नांदेड मनपाचे माजी महापौर आनंदराव पाटील चव्हाण तथा नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांचे वडील होत. नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव चव्हाण यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्म िक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित नायगाव येथील स्वामी समर्थ केंद्र येथे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण व विराज पाटील चव्हाण यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो साठी 71 हजार रुपयाची देणगी देण्यात आली. यावेळी गुरुपीठ प्रतिनिधी बोरगावकर व सर्व सेवेकरी उपस्थित होते. तसेच कै शंकरराव अमृतराव पाटील चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कोलंबी येथील गुरुवर्य श्री 108 श्री महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली महापूजा नंतर कै शंकरराव पाटील चव्हाण यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाधी स्थळाचे विधीवत पूजन श्रीकांत पाटील व विराज पाटील यांच्या हस्ते तसेच चव्हाण परिवाराच्या वतीने व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी वसंतराव पा चव्हाण ,केशवराव पा चव्हाण, हनमंतराव पा चव्हाण, आनंदराव पा चव्हाण, सुधाकर पा चव्हाण, श्रीनिवास पा चव्हाण धनंजय पा चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पा चव्हाण, श्रीधर पा चव्हाण, डॉक्टर विश्वास पा चव्हाण , डॉक्टर अमर पा चव्हाण, प्राचार्य रवींद्र पा चव्हाण, श्रीधर पा चव्हाण, पंकज पा चव्हाण, गजानन पा चव्हाण, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव आप्पा बेळगे ,बाबुराव पाटील जांभळे, संजय आप्पा बेळगे, शिवाजी पाटील पाचपिंपलीकर, दिलीप पांढरे, नारायण पा जाधव, पंडित पा.कल्याण दयानंद भालेराव, शरद भालेराव, माणिक पा चव्हाण, रमेश पा शिंदे, पंढरी भालेराव, संजय पा चव्हाण पांडू पा चव्हाण साईनाथ चन्नावार, सर्व नगरसेवक यांच्या सह पत्रकार, व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy