तुळजाभवानीच्या चेअरमनपदी श्रावण पाटील भिलवंडे, तर व्हाइस चेअरमनपदी अशोक पाटील मुगांवकर !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
         नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर मोठ्या शिता फितीने बहुमताचा आकडा जवळ ठेवलेल्या भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांची नायगांवच्या सहकारी निबंधक संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बोलविण्यात आलेल्या पहिल्या बैठकीतच आज दि 7 एप्रिल रोजी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन म्हणून अशोक पाटील मुगांवकर यांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय औअधिकारी के. डी. गव्हाने यांनी केली.
 आज सकाळी 11 वाजता बोलावण्यात आलेल्या पहिल्या नवनिर्वाचित तुळजाभवानी जिनिंग संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदासाठी श्रावण पाटील भिलवंडे सर व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक पाटील मुगावकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक निर्णय अधिकारी के डी गव्हाणे यांनी घोषित केले. या बैठकीला शिवराज पाटील होटाळकर, सचिन भगवानराव बेंन्द्रीकर, मोहन पाटील भिलवंडे, हाणमंत गंगाराम मिसे, बालाजी रामचंद्र चिंतावार, नारायण माधवराव खनपटे, बाळासाहेब रामराव शेळगांवकर, वसंत शरणाप्पा कस्तुरे, व्यंकटराव विश्वनाथ कोकणे, सौ.सरोज आनंदराव बावणे, बुके पद्ममीनबाई रामचंद्र हे तेराजण भिलवंडे गटाचे तर खतगांवकर गटाचे मोहनराव पाटील धुप्पेकर, अंबादास संतुकराव शिनगारे हे दोघेही उपस्थित होते. बिनविरोध निवड झाल्याचे समजताच भाजपाचे कार्यकर्ते व श्रावण पाटील भिलवंडे यांच्या समर्थकांनी फटाक्याची जोरदार आतिषबाजी करून आनंद साजरा केला.
 भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांची चेअरमन पदी व अशोक पाटील मुगांवकर व्हाईस चेअरमन पदी यांची निवड झाल्यानंतर नायगाव शहर भाजपाच्या वतीने शंकर पाटील कल्याण यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या