तुळजाभवानी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेच्या प्रशासकीय अध्यक्षपदी श्रावण भिलवंडे यांची निवड

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी]
 उप बाजारपेठेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे नरसी ( ता.नायगांव ) येथील ” तुळजाभवानी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग ” या संस्थेवर येथील भूमिपुत्र भाजपा नेते श्रावण शंकरराव भिलवंडे यांची प्रशासकीय अध्यक्षपदी निवड झाली आहे . त्यांनी दिनांक ५ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष तुळजाभवानी जिनिंग परिसरात जाऊन पहाणी केली आणि सहकार अधिकारी बी.सी.पवार , सचिव नंदू गादेवार , चंद्रकांत श्रीरामवार यांच्यामार्फत अद्यावत मालमत्तेचा पंचनामा नोंद करून पदभार स्वीकारला आहे .
    येथील तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मागील तीस वर्षांपूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली व गत वीस वर्षापासून बंद अवस्थेत आहे. जायमोक्यावर कसल्याच प्रकारची साधनसामग्री वा मशिनरी उपलब्ध नसल्याचे दिसून आले . अगोदरच्या संचालक मंडळाने मंडळाची मुदत संपल्यावर देखील सहकार खात्याकडे वेळेमध्ये सभासदांची यादी पाठवून निवडणूक घेण्यासाठी कसल्याच प्रकारचा पाठपुरावा केला नाही .त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 77 ( अ ) मधील तरतुदीनुसार सहकार सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी एस. जी .गल्लेवार यांनी नव्याने प्रशासकीय मंडळाची निवड जाहीर केली असून प्रशासकीय अध्यक्ष म्हणून श्रावण शंकरराव भिलवंडे तर संचालक म्हणून अशोक व्यंकटराव ताटे व मेहबूबबेग बाबाबेग पटेल यांची नियुक्ती केली आसल्याचे आदेश काढले आहेत .
     येथील तुळजाभवानी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्था संस्थेवर मला विद्यमान सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली याबाबत मी आगामी काळात तुळजाभवानी जिनिंग नव्याने अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबतचे मत नवनियुक्त प्रशासकीय अध्यक्ष श्रावण भिलवंडे यांनी माध्यमांसी बोलताना व्यक्त केले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुती भिलवंडे , मोहन भिलवंडे , गंगाधर वडगावे, अलीम पटेल, व्यंकट कोकणे, साईनाथ अक्कमवाड, ग्रा.पं. सदस्य राजू सुर्यवंशी, राम खनपटे, त्र्यंबक डाके, किशन खनपटे, यांसह गावातील नागरिक उपस्थित होते .
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या