तुराटी गाव ग्राम पंचायत मधुन बिनविरोध निघाल्याने उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी उमेदवाराचा सन्मान करताना.

उमरी तालुक्यातील तेलगंणा लगत असलेल्या तुराटी हे गाव ग्राम पंचायत मधुन सात सदस्य बिनविरोध काढुन तालुक्याला आर्दशाचा पायंडा दाखऊन दिल्याने भागाचे उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी या तुराटी च्या ग्राम पंचायत निवार्चित सदस्याचे सन्मान केले.

या तुराटी गावाला एसटी महिला सरपंच पदाचे आरक्षण झाल्याने सरपंच पदाचे दावेदार सौ.कलावतीबाई पोशट्टी पोसलवाड ह्याचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले तर सदस्यामध्ये वाघे साईनाथ गंगाधर, लक्ष्मण पाटिल सावंत, सौ.शोभाबाई भोजराम सावंत,सौ.शोभाबाई रविकुमार वाघे, श्रीमती विमलबाई सावंत,बाबु अम्रता जोंधळे आधी चा ही सन्मान करत उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी हे सामाजिक बांधिलकी जोपासत भागातील शेतकरी सुधारला पाहिजे हे लक्षात घेऊन गावाच्या सार्वजनिक विकास कामासाठी गावा लागत असलेल्या तळ्यातील गाळ ऊपसा करुन घेण्यासाठी व ती गाळ शेतात टाकण्यासाठी एक जेसीबी देतो असे आश्वासन दिले. यावेळी मुकूंदराव पाटिल सावंत, मल्लाना वाघे,बाबु पाटिल सावंत,पिराजी मुदलोड आदी यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या