12 वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2021 च्या म्हसळा तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! 

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे ]

12 वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2021 म्हसळा तालुका येथील,आयडियल इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेज. येथील वाणिज्य शाखेचा 100% निकाल लागला.

अनास नूरमहंमद मुल्लांनी हा 87% गुण घेऊन प्रथम आला.

तर दुसऱ्या क्रमांकाने काझी फातिमा सुफियान हि 81% गुण घेऊन यशस्वी झाली आहे.

तर तिसऱ्या क्रमांकाने कुर्बान फरहान रिझवान यांनी यश संपादन केले आहे.

 

संस्थेचे संस्थापक श्री नजीर कादरी, संस्थेचे अध्यक्ष सय्यद जमीर, मुख्याध्यापक रशीद दस्तगीर मुल्लांनी, संस्थेचे सर्व पदधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व पालक यांच्या कडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कला व वाणिज्य ज्यु. कॉलेज मेंदडी (कोंड ) 12 वी कला व वाणिज्य शाखेचा 100% निकाल लागला असून यात, कला या शाखेतून प्राजक्ता हरिचंद्र नाकती हि 69% गुण घेऊन प्रथम क्रमांकाने यशस्वी झाली. तर द्वितीय क्रमांक अश्विनी कृष्णा कांबळे हीने 68% गुण मिळवून यश संपादन केले आहे.

तर वाणिज्य शाखेतून प्रथम पायकोली लैला कृष्णा 73% गुण घेऊन उत्तीर्ण झाली तर द्वितीय क्रमांक पूजा काशिनाथ गाणेकर 71.16% तर तृतीय निवळकर मोसमी अनिल 69% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री कृष्णा धुमाळ, प्राचार्य संदीप कांबळे, संस्थेचे सर्व सभासद शिक्षक ग्रामस्थ यांच्या वतीने यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या