आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून वरसोली लेले चौक ते भवानी नाका रस्ता तसेच रॉयल मोटार ते वरसोली विठ्ठल मंदिर रस्त्याच्या कामासाठी रुपये २० लाख मंजूर !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]

कार्यसम्राट आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून अलिबाग मधील वरसोली लेले चौक ते भवानी नाका रस्ता तसेच रॉयल मोटार ते वरसोली विठ्ठल मंदिर रस्त्याच्या कामासाठी रुपये २० लाख मंजूर करण्यात आले आहेत.

सदर कामांचा शुभारंभ आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी व वरसोली विभागातील पदाधिकारी तसेच शिवसेना कार्यकर्ते यांच्या उपस्थित झाला. या कामामुळे वर्सोली च्या नागरिकांनी आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांचे आभार मानले आहेत.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या