शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय उमरी येथे रुग्णांना फळे वाटप करुन उद्धव ठाकरे यांना निरोगी दिर्घ आयुष्य लाभो यासाठी रुग्णाचे आशिर्वाद मिळावे.
आज दि २८ जुलै शुक्रवारी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमरी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील सावंत गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामिण रुग्णालय येथे रुग्णांनाफळ वाटप करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ चंदापुरे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील सावंत,शहर प्रमुखअँड विशाल अचूकवार,तालूका संघटक डॉ गोविंद राठोड, उपतालुकाप्रमुख गोविंद पाटील शिंदे, अंबाजी पाटील पवळे,बालाजी पाटील ढोल उमरीकर विभाग प्रमुख,माधव पाटील ढगे विभाग प्रमुख, विश्वांभर पाटील चंदापुरे,राजेश पाटील जाधव छावा तालूका अध्यक्ष,विजय पाटील चव्हाण,गजानन अलसटवार ,राहुल राठोड,ृ रावसाहेब पाटील वडजे, मनोज पाटील जाधव, विनायक पाटील सुर्यवंशी,प्रकाश पाटील ‌शिंदे, सचिन वाघमारे,शिवाजी नामेवार,दता येगलेवाड, उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या