स्वातंत्र्य सैनिक कै उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ गुणवंतांचा सन्मान

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
येथील जुन्या पिढीतील उद्योगपती स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ मेडेवार यांच्या परिवाराच्या वतीने आर्य वैश्य समाजातील दहावी बारावी एमपीएससी यूपीएससी आदी विविध परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या निमित्ताने दिनांक २१ जुलै रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता श्री भगवान बालाजी मंदिर नरसी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यास मित्रपरिवार व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेडेवार परिवाराच्या वतीने श्रीराम उद्धवराव मेडेवार, वसंतराव उद्धवराव मेडेवार, राजेश्वर उद्धवराव मेडेवार,सदानंद उद्धवराव मेडेवार, व मेडेवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या