अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे सरसकट तात्काळ पंचनामे करा- युवा नेते शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर

गेले आठ ते दहा दिवस नांदेड जिल्ह्यात व तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत युवा नेते शिरीषभाऊ गोरठेकर साहेबांनी तहसीलदार बोथीकर साहेब यांच्याशी चर्चा केली आहे. उडीद, मुग, सोयाबीन, कापुस शेती नुकसानीच्या वस्तुस्थितीचे पंचनामे तात्काळ करून घेण्याबाबत सूचना केल्या असून आॅक्टोबर महिन्यात तालुक्यात उडीद, मुग, सोयाबीन कापणीचा हंगाम असतो. ऐन कापणी हंगामात तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरयांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाची पूर्णतः नासाडी झाली आहे. परिपक्व झालेली शेती पाण्याखाली आली आहे. या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाकडे पाठपुराव्यासाठी निवेदन दिले हे निवेदन कोरोणामुळे सोशल अंतर पाळुण देण्यात आले. यावेळी जि.प सदस्य प्रतिनिधी आनंदराव यल्लमगोडे, शहरध्यक्ष भाजपा विष्णुभाऊ पंडित, शंकर सितावार, अमित पटकुटवार उपस्थित होते..

ताज्या बातम्या