दि. 17 वार गुरुवार रोजी मौजे कृष्णूर ता.नायगाव खै येथे सकाळी ठीक 11 वाजता “उमेद आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुख्य कार्यालय बेलापूर मुंबई येथील मा.रामदासजी धुमाळे राज्य अभियान व्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती. ते आवर्जून नायगाव तालुक्यातील कृष्णूर या गावी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री द्वारकादास राठोड व श्री माधव भिसे उपस्थित होते,प्रास्ताविक अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक व सूत्र संचालन श्री बाबू डोळे तालुका व्यवस्थापक-FI यांनी केले.
“उमेद आपल्या दारी” हा कार्यक्रम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष नायगाव खै व क्रांती महिला ग्रामसंघ यांच्या वतीने घेण्यात आला.सदर कार्यक्रम हा एकदिवसीय मार्गदर्शन व प्रदर्शन मेळावा म्हणून घेण्यात आला.या कार्यक्रमात महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जसे घोंगडी, हर्बल प्रोडक्ट, बांगडी व्यवसाय, लोणचे, डाळी, कटलरीसामान, कापड व्यवसाय यांचे छोटेखाणी प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच आरोग्य उपकेंद्र कृष्णूर येथील श्री मंगनाळे, श्री वाघमारे, सिस्टर, आरोग्य सेवक, दायी, लॅब टेक्निशियन व इतर त्यांच्या सर्व स्टाफ द्वारे HB टेस्ट, लहान मुलांचे लसीकरण, कोरोना लसीकरण, ANC, PNC तपासणी व इतर काही किरकोळ तपासणी करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक कृष्णूर चे शाखा व्यवस्थापक श्री जाधव साहेब उपस्थित होते त्यांनी कार्यक्रम स्थळी 2 समूहांना कर्ज वितरित केले, गटांचे व वैयक्तिक महिलांचे खाते वाटप देखील केले. उमेद व बँक संलग्नित बँक सखी शिवमाला पचलिंग व बीसी सखी पूजा तसबीरे यांचे पण पॉईंट चे स्टॉल दिसून आले. सदर कार्यक्रम प्रभावी व्हावा यासाठी सुरेश कागडे व संच यांच्या माध्यमातून अभियान प्रबोधनपर गायन कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उद्देशुन बोलताना मा धुमाळे सर म्हणाले की,आज जे काही कौटुंबिक,व्यावसायिक वा राजकीय जीवन असेल त्यामध्ये जे निर्णय होत असतात त्यात महिलेच्या विचारांची किंमत होत आहे.आज महिला चूल आणि मूल एवढ्या पुरते मर्यादित नसून त्याहीपलीकडे झेप घेत असल्याचे दिसून येते. त्यांनी आंध्रप्रदेश मधील उदाहरण देताना सांगितले की, एक खेडूत महिला बँकेत गेल्यावर प्रश्न विचारला की तुम्हाला अभियानाने काय दिले तर त्या महिलेने उत्तर दिले की आज मला बँकेच्या मॅनेजर साहेबानी बसायला खुर्ची दिली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.तसेच राज्यामध्ये 6 लाख च्या वर महिला समूह व 60 लाख च्या वर महिला समूह मध्ये जोडल्या गेलेल्या आहेत.
त्या माध्यमातून कृष्णूर येथील पण 29 समूह एकत्र येऊन उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत MIDC मध्ये एक महिलांची इंडस्ट्री उभी राहावी यासाठी मी असेल किंवा आमचा सर्व स्टाफ तालुका व जिल्हा स्टाफ आपणास कोणत्याही पातळीवरची मदत करायला तयार आहे.या गावात क्रांती ग्रामसंघाला निधी वितरित केला आहे. तसेच समूहांना देखील खेळते भांडवल, बँक कर्ज उपलब्ध करून दिले आहे व स्वतःची बचत त्यामाध्यमातून 290 महिलांनी एकत्र येऊन उद्योग व व्यवसाय सुरु करावा असे सांगितले.
शेवटी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णूर येथील ICRP मधूताई कागडे, बँक सखी शिवमाला पचलिंग यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी केंद्रीय व जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री ढगेसर व श्री वारघडे सर, पत्रकार श्री अनिल कांबळे, विमल जेटी, रेखा कांबळे, जनाबाई शिंदगे, सुगरा बेगम, स्वाती चिंचोले, संगीता जाधव, महानंदा गायकवाड, हरण्याबाई सुरणे, मायावती वाघमारे, दीपिका गायकवाड, सोनाली गंजेवार, क्रांती ग्रामसंघाच्या पदाधिकारी, समूहाच्या महिला, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy