100 ज्येष्ठ नागरिकांचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करणार – उमेश चव्हाण

पुणे –

कोव्हीड – १९ च्या प्रदूर्भावात सर्वच शासकीय यंत्रणा काम करीत असताना, इतर अनेक आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया बंद आहेत.

अनेक ज्येष्ठ नागरिकांची डोळ्यांची शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्ण हक्क परिषदेने पुढाकार घेतला असून १०० ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची ऑपरेशन ४ व ५ डिसेंबर – २०२० करण्यात येणार असल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.
उमेश चव्हाण म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आर्थिक पडझडीमुळे अनेक नागरिकांना घरातील ज्येष्ठ वडीलधाऱ्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागत आहेत. तर शासकीय यंत्रणा करोनाच्या रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असताना इतर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून रुग्ण हक्क परिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये निश्चित केले आहे.
रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी केंद्रीय कार्यालयात अर्ज उपलब्ध केले असून, अर्जासोबत डोळ्यांच्या ऑपरेशन साथीच्या चाचण्या केल्याची प्रमाणपत्र, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, वीजबिल, दोन फोटो जोडून लवकरात लवकर अर्ज दाखल केल्यास तातडीने उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी ४ व ५ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अधिक माहितीसाठी ८८०६०६६०६१, ७७७६८७९३१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ताज्या बातम्या