उमरी शहरातील इस्लामपुर भागात अनेक घरात शिरले पाणी ; कैलाश गोरठेकर धावले मदतीला !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
युवा नेते कैलाश गोरठेकर यांनी उमरी शहरातील इस्लामपुर येथील खालच्या भागात काल पासुन पडणार्‍या मुसळदार पावसामुळे अनेक कुंटुबाच्या घरात पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन सुरक्षित बाहेर काढले.

कैलाश गोरठेकर यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची पाहणी केली आणि मुख्यधिकारी व तहसिलदार यांना घटना स्थळी बोलावून प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी अशी विनंती केली.

यावेळी सोबत माजी नगराध्यक्ष व गटनेते प्रविण सारडा, माजी नगरसेवक एजास खान, करिम टेलर, नगरसेवक बाळु शिंन्दे, नगरसेवक फारुख सेठ, नगरसेवक रतन खंदारे, नगरसेवक भगवान मूदिराज, जाकीर खान, नगरसेवक गजानन खांडरे, अमित पटकुटवार, गजानन खांडरे, राजु सवई, मंगेश डोंप्पलवार, रोहित देवकवाड उपस्थित होते.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या