उमरी नगरपालीकेच्या नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी काॅग्रेस पक्ष कार्यालयात अर्ज दाखल करावे – मारोतराव कवळे गुरूजी

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी नगरपालीका २०२२ चा सावञिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यात एकूण एक ते दहा प्रभाग निहाय  या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाकडून इच्छूक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमरी येथील काॅग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपले अर्ज भरावेत.
तसेच अर्जासोबत आपले ओळखपत्र, आधारकार्ड, मोबाईल क्रमांकासह अर्ज दाखल करावेत असे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनी केले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हादराव पाटील इज्जतगावकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, विजयकुमार उत्तरवार, विधानसभा अध्यक्ष बापुसाहेब पाटील कौडगावकर, शहध्यक्ष किशोर पबितवार, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष दिगांबरराव गायकवाड नागठाणेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्ष आदिजण उपस्थित होते.
यावेळी होणा-या नगर पालीकेच्या निवडणुकीत इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी दाखल करताना तो त्याच प्रभागातील असावा जेणेकरून मतदारांना ही इच्छूक उमेदवाराची परिचयाची ओळख देताना अडचण निर्माण होणार नाही. असेही कवळे गुरूजी म्हणाले.

संपर्क – कवळे गुरुजी यांचे जनसंपर्क कार्यालय उमरी…
(आनंद चव्हाण – 99236 39954)

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या