उमरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी!
(नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी)
दिनांक १९|०२|२०२१
उमरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेच्या ठिकाणी दिव्यांची आकर्षक आरासना करण्यात आली.
तसेच रंगीत फटक्याच्या आतिषबाजीत शिवजन्माचा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळीं सर्व पक्षीय पदाधिकारी,मराठा संघटन कार्यकर्ते,सखल समाजातील युवावर्ग,व्यापारी, पत्रकार,विश्व हिंदु परिषद, बजरंगदल, श्रीराम सेना चे कार्यकर्ते मोठ्या संख्येनें उपस्थित होते.