प्रेमलाबाई इनामदार शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

[ कुंडलवाडी – विशेष प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील कै.प्रेमलाबाई इनामदार प्राथमिक शाळेत शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारे आईबाबांची शाळा प्रशिक्षण पाहिले हे उपक्रम व इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असा सयूंक्त कार्यक्रम घेण्यात आला.
आईबाबांची शाळा या उपक्रमा अंतर्गत उपस्थित पालकांना योग्य मार्गदर्शन सहशिक्षिका सोलापूरे गीता यांनी केले आहे.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण,उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,राष्ट्रीय स्वयं सेवक संघ तालुका संयोजक विश्वनाथ अण्णा दाचावार,माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी अशोक कांबळे,संस्थेचे संचालक अमरनाथ कांबळे,मुख्याध्यापक शंकर गायकवाड,सहशिक्षक धोंडिबा बगाडे,कैलास जवादवार,गीता सोलापूरे,बालाजी वडजे,कृष्णा मोरे आदीसह मोठ्या प्रमाणात पालक,विध्यार्थी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या