आपल्या अडचणी सोडवायचे असतील तर आपल्याला एकत्र येणे गरजेचे असते आणि त्यातून संघटनेचा जन्म होतो. असे प्रतिपादन मा. किशोर मोहिते रायगड जिल्हा कार्याध्यक्ष यांनी अखिल रायगड प्राथिमक शिक्षक संघ शाखा म्हसळा या कार्यालयाच्या उदघाटना प्रसंगी केले या वेळी नूतन कार्यकारणीची नेमणूक करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती त प्रा महंमद शेख, माजी केंद्र प्रमुख श्री करंबे सर, श्री येलवे गुरुजी, श्री यादव गुरुजी, प्रा. महंमद शेख सर यांनी ही या प्रसंगी संघटनचे महत्व सांगितले कि आपण जर एकसंघ झालो तर आपल्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत ते आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो त्या साठी संघटना असणे गरजेचे आहे.
आखिल रायगड प्राथिमक शिक्षक संघ ही संघटना संपूर्ण देशात काम करतेय तस संघटनेचा इतिहास पहिला तर 1910 मध्ये स्थापन झालेली आहे. संघटनेला वारसा आहे, इतिहास आहे असे प्रतिपादन मा. यादव गुरुजी यांनी केले.श्री करंबे गुरुजी यांनी ही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्या दिल्या. नूतन संघटनेच्या अध्यक्ष सौ दातार मॅडम यांनी ही संघटनाच्या ध्येयधोरना नुसार कामकरुन अडचणी सोडवू अशी ग्वाही दिली श्री मांडवकर यांनी ही मार्गदर्शन केले, श्री येलवे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. नूतन पदाधिकारी शाखेच्या अध्यक्ष सौ शुभदा संतोष दातार, श्री कार्यध्यक्ष प्रकाश कृ. मांडवकर, कोष्यधक्ष. सौ संगीता बा आंबेडकर, सरचटणीस श्री रमेश गोविंद जाधव यांची नेमणूक करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. खेडेकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचलन श्री रमेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे आभार अभिनेते श्री शशी भिंगारदिवे यांनी केले कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
(न्यूज पोर्टल साठी नवीन पत्रकारांना संधी आजच संपर्क करा)
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy