अ.भा.युनाटेड किसान सभेच्या वतीने नायगाव येथे मागणी दिवस साजरा !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

मोदी सरकारने खोटारडे बोलून दहा वर्षांपूर्वी सत्तेवर आरुढ झाले आणि शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्या विषयी नाकर्तेपणाची धोरणे राबवीत असल्यामुळे अ.भा.युनाटेड किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आज रोजी नायगाव आठवडा बाजारातील विविध चौकामध्ये घोषणाबाजी करीत जाहीर पत्रके कॉम्रेड देवराव आईलवार यांच्या नेतृत्वाखाली वाटप करुन भारतीय मागणी दिवस साजरा केला.

मोदी सरकार पाचपट विकासाचे तुंणतुणे वाजवत आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, एकात्मिक बाल विकास योजना, मुलांना दुपारचे जेवण योजना या आघाडीच्या योजनांना सरकारने मूठमाती दिली आहे त्या जवळपास बंद पडले आहेत त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद 40% सरकारने कमी केली आहे कोणत्याही अर्थाने पाहिले तर या योजनाची महत्त्व सरकारनेच कमी केले आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन अखिल भारतीय विनायटेड किसान सभा नऊ जानेवारी 2025 हा दिवस किसान हमी भावासाठी कायदेशीर तरतूद करावी,राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्याखाली 200 दिवस काम आणि सहाशे रुपये पर दिवस मंजुरी, शेतमजूर गरीब आणि मध्यम शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, वन हक्क कायदा 2006 ची पूर्ण अंमलबजावणी करावी, भूमिहीनना जमीन भुकेल्यांना अन्न बेघरांना घर बेकारांना काम देण्यात यावे या मागण्यासाठी नायगाव शहरांमध्ये मागणी दिवस म्हणून साजरा केला आहे यामध्ये कॉम्रेड देवराव आईलवार,अँड.अरविंद देशपांडे, धोंडीबा कांबळे रुईकर,कॉम्रेड गंगाधर गोणेकर, कॉम्रेड किशनराव देशमुख, कॉम्रेड बाबुराव देवाले यासह मारुती कांबळे, जळबा पाटील शहापुरे, देवराव सुरेकार, नागोराव झगडे, संदीप वाघमारे, पुंडलिक जाधव, साहेबराव सुरेकार, दिगंबर सूर्यवंशी, हनुमंत जोगदंड, व्‍यंकटी सूर्यवंशी, अशोक पवार रुईकर,नामदेव पवार, शिवाजी वाघमारे कुंटूरकर आणि बळीराम वाघमारे धानोरकर या कार्यकर्त्यांचा समावेश होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या