राजगडनगर ग्रा.पं.च्या उपसरपंच पदी निवृत्ती झगडे यांची निवड !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
  नायगाव तालुक्यातील मौजे राजगड नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुप्रिया राहुल झगडे यांच्या उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 रोजी सदर ग्रामपंचायत मध्ये निवडणूक अधिकारी व्हि व्हि.वडजे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची जास्तीचे बहुमत पाहून उपसरपंच पदी निवृत्ती भुजंगा झगडे यांची नियुक्ती करण्यात आली.
   याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे राजगडनगर येथे गेल्या अडीच वर्षांपूर्वी श्री संत बाळगीर महाराज ग्राम विकास पॅनलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शंकर गायकवाड, तेजराव पाटील चोंडे, श्रीधर पालनवार यांनी आपले पॅनल उभे करून लोकशाही मार्गाने निवडणुकीत विजय मिळवीत एकूण सात सदस्य पैकी सुप्रिया राहुल झगडे, निवृती भुजंगा झगडे, छायाबाई पालनवार, सावित्राबाई चोंडे या चार उमेदवारांना घवघवीत मताने निवडून आणले होते.
अडीच वर्षांपूर्वीच पॅनल प्रमुखासह चारही सदस्यांनी एकमेकांना समझोता काढून अडीच अडीच वर्षासाठी उपसरपंच पदे सुप्रिया झगडे आणि निवृत्ती झगडे यांना ठरविल्याप्रमाणे त्या अडीच वर्षाचा कार्यकाळ सुप्रिया झगडे यांचा संपल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी व्हि व्ही वडजे यांनी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सदस्यांची मतदान प्रक्रिया पार पाडून निवृत्ती झगडे यांच्या बाजूने जास्तीचे मते असल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी सूर्यकांत झगडे, शिवाजी चोंडे, राहुल झगडे, गंगाधर झगडे, सिद्धार्थ हनुमंते, विलास हनुमंते, प्रथमेश झगडे, हैबती झगडे, किशन गायकवाड, परमेश्वर गायकवाड, मिलिंद झगडे,व्यंकट धसाडे, दिगंबर झगडे,मारुती गायकवाड, संजय झगडे ,साहेबराव कागडे, माधव गायकवाड, अंबादास झगडे, रमेश झगडे, कामाजी झगडे, देविदास हनुमंते यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या