AIR (All India Rank) 566 मिळवत उत्तुंग यशाला गवसणी ।
[ रायगड म्हसळा प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे l
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील शिरोली पूर गावाच्या व सध्या वाई येथे वास्तव्यास असणाऱ्या श्री.सचिन देवराम लांडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.
त्यांना (All India Rank) AIR 566 मिळाली असून भविष्यात ते आयएएस किंवा आयपीएस पदासाठी दावेदार असतील. संबंध पुणे जिल्ह्यात आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे सचिन हे बहूधा पहिलेच व्यक्ती असावेत.
सचिनच्या या यशात त्याचे आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे. सचिनचे वडील देवराम लांडे हे शासकीय मुद्रणालय वाई येथे कार्यरत आहेत. सचिनच्या यशात त्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. यापूर्वी एमपीएससीमार्फत सचिन ची निवड नायब तहसीलदार पदी झाली होती.
मागील अनेक वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे जुन्नर तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून सचिनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy