कोविड प्रतिबंधत्मक 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
दिनांक 6/1/2022 रोजी प्रा.आ.केंद्र मेंदडी जिजामाता हायस्कूल आगरवाडा वरवटणे येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (कोव्हक्सिन लस ) करण्यात आले. या वेळी कोविड योद्धा श्री बंडू ढोले आरोग्य सेवक, श्रीमती प्रविणा ढंगारे आरोग्य सेविका, श्री जयकृष्ण वेटकोळी आरोग्य सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले. श्री.अमोल कोल्हे आरोग्य सेवक यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणा बाबत माहिती व मार्गदर्शन केले.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदीप कांबळेकर, श्री.अंकुश गाणेकर, श्री.अंगद कांबळे हे उपस्थित होते आशाताई मदतनीस मनालीताई सुतार, सुजाता नाक्ति, भावना गाणेकर सदरील यांनी समन्वयक म्हणून सहकार्य केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या