वैभव घाटे यांची आखिल भारतीय सरपंच परिषदच्या नांदेड जिल्हा कोअर कमिटी कार्यकारणी सदस्य पदी निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील गंजगाव चे माजी सरपंच प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते वैभव घाटे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नांदेड जिल्हा कोअर कमिटी कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून वैभव घाटे यांनी लोककल्याणाचा ध्यास घेतला. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावाला चांगल्या सुविधा देण्याचा त्यांनी अतिशय प्रमाणिक प्रयत्न केले. अनेक नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या.
त्यामुळे मांजरा नदी काडी आसलेल्या गावाकडे सगळ्यांचे लक्ष जायला सुरूवात झाली. गंजगाव गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार इत्यादी पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहे त्यांच्या कार्यकाळात गावामध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या, वैभव घाटे ग्रा.पं. सदस्य तथा सरपंच प्रतिनिधी होण्याआधी गंजगाव गावाला पाण्याची फार मोठी समस्या होती, पण त्यांच्या काळात गंजगाव गावाला पहिल्यांदा वार्डा वार्डात बोरवेल पाण्याची टाकी नळपाणीपुरवठा योजना सुरू झाली, पाणीपुरवठा योजना, अशा अनेक सार्वजनिक आणि गावातील लोकांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना वैभव घाटे यांच्या कारकिर्दीत मार्गी लागल्या एक सरपंच गावाचा कसा कायापालट करू शकतो याचं एक उदाहरण वैभव घाटे यांच्या कामातून परिसरातीला जनतेला दिसले.
तालुक्यातील इतर ग्रामपंचायती गंजगाव गावाकडे एक स्मार्ट व्हिलेज म्हणून पाहु लागले. वैभव घाटे यांच्या अनुभवाचा फायदा आजूबाजूच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना व्हावा या हेतून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नांदेड जिल्हा कोअर कमिटी कार्यकारणी सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली संस्थेच्या माध्यमातुन निराधार महिलाना साड्यांचे वाटप करून गावातील आनेक विधवा निराधार दिव्यांग लोकासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन मासिक पेन्शन चालु करुन दिले सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यांच कार्याची दखल घेवुन अखिल भारतीय सरपंच परिषद चे संस्थापक अध्यक्ष जयंवतराव पाटील यांनी नुकतेच नियुक्ती पञ देवुन शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या