बिलोली येथे वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी बैठक संपन्न !

बिलोली वंचित बहुजन आघाडी कार्यालय येथे जिल्हा महासचिव श्याम भाऊ कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन इंद्रजीत पंचाळ यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गाव तिथे शाखा शाखा तिथे बूथ प्रमुख नेमणूक करून येणारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था पुर्ण ताकतीनिशी निवडणूक लढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस तालुकाध्यक्ष धम्मदीप गावंडे ,तालुका महासचिव गजानन चिंतले, युवा तालुका अध्यक्ष भुजंग पाटील लाकडे, युवा तालुका महासचिव अमोलभाऊ शेरे, तालुका प्रवक्ते मुकंदर कुडके, शिवा शिवशेटे, शिवाजी विचारे, धम्मपाल जाधव, धम्मा भेदेकर, गंगाधर कांबळे, तालुका कोषाध्यक्ष शिवराज सूर्यकर, साईनाथ जाधव, संदेश जाधव शेख शाकीर, इंग्रजीत डुमणे,
चंद्रशेखर चिमणापुरे आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या