उमरी येथे वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
 बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 22 रोजी तालुका उमरी च्या वतीने वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा सदस्य करुणाताई खंडेलोटे यांच्या नेतृत्वाखाली पैगंबर मोहम्मद बिल आणि न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम आरक्षणासाठी शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते अश्या अनेक मागण्यांसाठी तहसीलदार उमरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते एजाज खाँन, अहमद खाँन, भारिप बहुजन महासंघाचे माजी शहर अध्यक्ष शेख बसीर, शेख अजर, एमआईएम  उमरी तालुका अध्यक्ष सय्यद इलियास, अहेमद सय्यद, अलमाज पटेल, सलमान बाबू शेख, मसुद इब्राहिम खुरेशी, संतराम डोंगरे, गंगाधर मारोती लांडगे, प्रमोद कोलते, प्रविण वाघमारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

subscribe/ सबस्क्राईब करा.

ताज्या बातम्या