वंचित चे कृषी कायदा,पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन
(धर्माबाद प्रतिनिधी- नारायण सोनटक्के)
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून अदानी आणि अंबानी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी संधी देत आहे.या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून यामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यासोबतच, स्वस्त धान्य दुकानामधून गरिबांना मिळणाऱ्या धान्यालाही गरिबांना या कायद्यामुळे मुकावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिल्लीमध्ये केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयात तालुका तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे शेती विषयक कायदे रद्द करा व पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढ मागे घेण्यात यावेत या सर्व मागण्या साठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात समोर वंचित बहुजन आघाडी ने मोठ्या प्रमाणात धरने आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडी च्या मागण्या केंद्राने लागु केलेले शेतकरी विषयी काळे कायदे रद्द करा व पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढ मागे यासाठी त्याच धर्तीवर धर्माबाद तहसील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडी धर्माबाद च्या वतीने एक दिवसीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
धर्माबाद च्या वतीने सूरु आसलेल्या आंदोलनास नांदेड हुन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संयोजक देवानंद सरोदे, दक्षिण जिल्हा महासचिव श्याम भाऊ कांबळे, महेंद्र सोनकांबळे, धर्माबाद तालुका अध्यक्ष एकनाथ जिंकले, महासचिव गौतम देवके रोशनगावकर, जे.के.जोंधळे,शंकरराव वाघमारे बन्नाळीकर, कॅप्टन मारोतराव मिसाळे, राहुल भुतनरे, दिलीप किलबिले,साहेबराव बेल्लुरकर,मोहन पांचाळ, केरबा वाघमारे, श्रीकांत पोवाडे, शंकर डाकोरे, कोंडीबा मेडेवार, वंचित बहुजन आघाडी चे धर्माबाद प्रवक्ते दलित मित्र युसूफ भाई, दिलीप बनसोडे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
सरकार कडे आमच्या भावना पोहचवावे असे म्हणत धर्माबाद चे प्रभारी तहसीलदार श्री शंकर हंदेश्वर साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.
आंदोलन कर्ते यांनी सकाळी ११ वाजता विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समता सैनीक दल चे कॅप्टन मारोतराव मिसाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात करून वंदन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहुजन आघाडी चे धर्माबाद शहराध्यक्ष भगवान कांबळे यांनी केले.
धर्माबाद चे पोलिस निरीक्षक सोहन माछरे साहेब यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिस कर्मचारी मा.श्री.रेणके साहेब, मा.श्री मसलगेकर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.