शेतकऱ्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदारना निवेदन…
(रायगड /म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)
बहुजन हृदयसम्राट बाळासाहेब तथा प्रकाशजीं आंबेडकर साहेब यांच्या आदेशा नुसार महाराष्ट्रात जागोजागी निवेदन देऊन शेतकऱ्यांना समर्थन दिले जात आहे.
याच अनुषंगाने रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा महासचिव आदरणीय सागर भालेराव यांच्या सुचनेनुसार शुक्रवार दिनांक 5/3/2021 रोजी दिल्ली येथे करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका श्रीवर्धनच्या वतीने श्रीवर्धन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या साठी सर्व कार्यकर्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.