वंचीत बहुजन आघाडी,देगलुर तालुका कार्यकारणी जाहीर ; संजय कांबळे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड !

देगलूर: वंचीत बहुजन आघाडी ची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून देगलुर येथे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि माजी शहर सचिव असलेले संजय कांबळे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, तर तालुका उपाध्यक्ष म्हणून डॉ.मारोती कांबळे करडखेडकर,अशोक बरसमवार,बाबसाहेब कटारे,मल्हारी घुलेकर,संतोष नामावाड,तर सचिव जयपाल कांबळे,सहसचिव पंढरी हिंगोले,संघटक पदी निशिकांत कांबळे केदारकुंठेकर, कोषाध्यक्ष शिवाजी रोट्टे आलूरकर,प्रसिध्दी प्रमुख संगम वाघमारे तर मारोती गायकवाड,सतीश गायकवाड,गणेश रेड्डी भुपतवार,बाबर पठाण यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकरणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले संजय कांबळे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड नगरपालिका, जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची समजल्या जात आहे.संजय कांबळे यांनी या पूर्वी शहर सचिव म्हणून अत्यंत यशस्वी धुरा सांभाळली होती, लोकसभा निवडणुकीत व दोन वेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सहभाग महत्वाचा होता. चरित्र संपन्न,अभ्यासू,सर्वांशी प्रेमाने वागणारे व कलरींग कॉन्ट्रॅक्टर क्षेत्रातही त्यांचं मोठ नाव आहे, अशा क्रियाशील कार्यकर्त्याची तालुका अध्यक्ष पदी निवड ही पक्षाला व वंचीत घटकांना मजबुती देण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. प्रदेश अध्यक्ष रेखताई ठाकूर यांच्या सहीने सदरील कार्यकरणीची निवड करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या