घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची आरक्षणाशिवाय झालेली पद भरती रद्द करून नव्याने राबविण्यात यावी वंचित युवा आघाडीची राज्यपाल आणि मुख्यमंत्री ह्यांच्या कडे तक्रार.

( मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क )
राज्यात घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रिया अनेक महाविद्यालयात पार पडली आहे.मागील काही वर्षा पासून ही नियुक्ती आरक्षणाशिवाय होत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून आजवर विनाआरक्षण करण्यात आलेली पद भरती रद्द करा अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडी च्या वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून नव्याने आरक्षण लागू करून ही पदभरती करण्यात यावी आणि आरक्षण शिवाय पदभरती करणाऱ्या महाविद्यालय संचालक ह्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
अनुदानित अशासकीय महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेत बहुतांश महाविद्यालयांनी सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी न करता निवड केल्याने पात्र उमेदवार सामाजिक आरक्षणापासून वंचित राहिले आहेत.ह्या बाबतीत अनेक संघटना तक्रारी करतात मात्र त्याची दखल घेतली जात नाही.महाविद्यालयात मात्र ह्या पदभरती बेकायदा सुरू आहेत.
सहायक प्राध्यापकांच्या मुलाखतीत सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करणे ही महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या महाविद्यालयांनी सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही, अशा महाविद्यालयाची चौकशी होणे गरजेचे आहे.कारण बहुतांश महाविद्यालयांत अनुसूचित जाती, जमाती, मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती सामाजिक आरक्षणाला खो देत ही निवड केली आहे, ह्या जाहिराती प्रकाशित होत असताना सामाजिक आरक्षण डावलून पद भरती बाबत विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे मूग गिळून गप्प आहे.ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत.
करिता गेल्या दोन वर्षात झालेल्या पद भरती प्रक्रिया ह्याची चौकशी करण्यात यावी तसेच आता सामाजिक आरक्षण शिवाय झालेली पदभरती रद्द करून आरक्षण सहित ही पदभरती करण्यात यावी करीता तक्रार राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री ह्यांना ई मेलवर पाठविण्यात आल्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या