वंचित बहुजन आघाडी धर्माबाद ची शहर कार्यकारिणी जाहीर !

  • शहराध्यक्षपदी राजु सोनकांबळे तर सचिव पदी राहुल शिरसे यांची निवड !
[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेच्या वतीने काल १५ सप्टेंबर रोजी धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात चर्चा करून शहराध्यक्ष कार्यकारिणीची सर्वांनु मते निवड करण्यात आली आहे.
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सह धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली असून वंचित बहुजन आघाडीचे ध्येय धोरणे राबविण्यासाठी या बैठकीत चर्चा होऊन व शहराध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तर धर्माबाद शहराध्यक्षपदी राजू पिराजी सोनकांबळे तर शहर सचिव राहुल गणपत शिरसे शहर उपाध्यक्ष किरण शंकरराव गजभारे शहर संघटक भीमराव उमडे तर सदस्य दिलीप राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीस तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले, महासचिव गौतम देवके, संघटक चांदोबा वाघमारे, सल्लागार जे.के. जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदानंद देवके, नागेश कांबळे, चंद्रकांत वाघमारे, भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष भगवान कांबळे, शेषेराव वाघमारे वाघमारे हसनाळीकर, थोरमोठे येताळा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर वाघमारे सह अनेक समाज बांधव उपस्थित होते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना तालुका शाखेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या