येथील रहिवाशी असलेल्या केंद्रीय मुख्याध्यापक शंकरराव हमंद यांची कन्या पायल हमंद हिने प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च उरून इस्लापूर येथून नुकतीच एमबीबीएस ची पदवी उत्तीर्ण झाली आहे,तिच्या या यशामुळे ती कुंडलवाडी येथील वंजारी समाजाची पहिली महिला डॉक्टर बनण्याचा तिला मिळाला आहे.
कुंडलवाडी येथील रहिवासी असलेल्या मुख्याध्यापक शंकरराव हमंद यांची कन्या डॉ पायल हमंद ही शालेय स्तरापासूनच अतिशय हुशार व अभ्यासू वृत्तीची होती, तिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण बिलोली येथील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट स्कूल येथे पूर्ण झाले.इयत्ता दहावी मध्ये ती तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा मान हि मिळवला होता, तर बारावीचे शिक्षण यशवंत कॉलेज नांदेड येथून पूर्ण करून खडतर अशा नीट परीक्षेत चांगले गुण घेऊन प्रकाश शिक्षण मंडळाचे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च उरून इस्लापूर या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी तिचा नंबर लागला होता.
त्यानंतर अभ्यासाच्या जोरावर कठीण परिश्रम घेत ती नुकतेच एमबीबीएसची पदवी उत्तीर्ण झाली आहे, त्यामुळे कुंडलवाडी येथील वंजारी समाजातून पहिली महिला डॉक्टर बनण्याचा तिला बहुमान मिळाला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व वंजारी समाज बांधव,नातेवाईक, मित्रमंडळी,आदींनी शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy