आशा वर्कर महिलेचा वसंत सुगावे पाटील यांनी थेट आरोग्यमंत्र्याशी घडवून आणला संवाद..!

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
आरोग्य विभागाच्या गावपातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर यांना मिळणारे मानधन, भत्ते वेळेवर मिळतात की नाही याबद्दल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. राजेशभैय्या टोपे साहेब व आशा वर्कर कर्मचारी यांच्याशी बोलणे करून दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांनी घुंगराळा येथील आशा वर्कर सौ.अर्चना ताई या महिलेशी संवाद साधून मानधन, भत्ते, व इतर अडचणीबद्दल सविस्तर माहिती घेतली.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या