आपला भाऊ म्हणून कोणत्याही वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार ; खा.वसंतराव चव्हाण !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि जनशक्ती पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षानी कोणत्याही प्रश्नासाठी आपण पुढाकार घ्यावे मी आपला भाऊ म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणत्याही वेळी उभा राहणार असे मत खासदार वसंतराव चव्हाण यांनी आ. बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.

      प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नायगाव तालुका शाखेच्या वतीने शहरातील मार्कंडे मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी खासदार वसंतराव चव्हाण,तर माधवराव बेळगे, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील देशमुख, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर, हनुमंतराव पाटील सुजलेगावकर, गणेश पाटील हांडे, हावगीरराव पाटील, संतोष हनमंते, राजीव पतंगे, शिवलिंग माटोरे, गंगाधर शेवाळकर, कमलाकर टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात योगायोगाने प्रहार संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष साईनाथ बोईनवाड, अनिल शेटे, गोविंद लोणे यांचाही वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला. सदर संघटनेच्या वतीने खासदार वसंतराव चव्हाण यांचा सामूहिकरित्या सत्कार करण्यात आला. प्रहार संघटना व जनशक्ती पक्षाचे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष राहुल अहंकारे लोहा,अनिल शेट्ट मुदखेड, साईनाथ जुनेकर धर्माबाद, हनुमंत सिताफुले बिलोली, हनुमंत ढगे भोकर, संतोष चामरेकर अर्धापूर, साहेबराव निवडंगे मुदखेड, गोविंदराव लोणे मुदखेड, राजश्री गवलवाड मुखेड, ओमप्रकाश निलावार व राजू आंगडे देगलूर, संजय भरकटे लोहा यांचीही उपस्थिती होती.तर खा. चव्हाण पुढे म्हणाले की, बच्चुभाऊ कडू अपंगासाठी हक्क मागणारा एक बुलंद आवाज आहे माझ्याकडूनही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व माझ्या विजयासाठी आपण मेहनत घेतली हे मी कदापि विसरणार नाही म्हणून अपंग बांधवांचे त्यांनी आभार मानले यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी यासह प्रहारचे गोपीनाथ मुंडे, मारुती मंगरुळे, राजेश बेळेगे, साईनाथ बोईनवाड, चंद्रकांत आईलवार, मिलिंद कागडे, प्रकाश नागोरे, एनडी आढाव यासह अनेकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मारुती मंगरुळे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या